संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे ग्रामपंचायतने बांधला पहिला वनराई बंधारा
एल निनोच्या संकटामुळे पाणीटंचाईमुळे होणाऱ्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे ग्रामपंचायतने लोकसहभागातून कळंबटेवाडी येथे वनराई बंधारा बांधला. सरपंच सुषमा बने यांनी या कामाला पुढाकार दिला.