फुलंब्री: फुलंब्री येथील तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून हायवा ट्रक चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
फुलंब्री येथील तहसील कार्यालय मध्ये मुख्य प्रवेशद्वार तोडून हायवा ट्रक चोरी केल्याप्रकरणी महसूल सहाय्यक यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने करीत आहे.