पनवेल: हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेची सखोल स्वच्छता मोहीम
Panvel, Raigad | Feb 13, 2026 श्री. गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. खारघर, नवी मुंबई येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेमार्फत सखोल स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार हिंद कि चादर कार्यक्रम स्थळ, नियोजित पार्किंग, आजूबाजूच्या ठिकाणांना जोडणारे रस्ते इत्यादी ठिकाणी डीप क्लीन स्वच्छता केली जात आहे.