जालना: 31 लाख 60 हजारांचा गुटखा व वाहनासह जप्त; एक आरोपी अटक, सतीश लाला जयस्वाल फरार
Jalna, Jalna | Apr 1, 2026 आज दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चंदंजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 31 लाख 60 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त केले. या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून सतीश लाला जयस्वाल हा आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती चंदंजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.छत्रपती संभाजीनगर