नागपूर शहर: 'नवनीत राणांना पक्षातून बाहेर काढा'; राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी
परतवाडा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात कोणताही धार्मिक अँगल नसून, राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत."नवनीत राणा यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत," असा गंभीर आरोप करत प्यारे खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून राणा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.