नागपूर शहर: नागपूरमध्ये तीन बसेसची धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
छत्रपती चौक येथील साई मंदिर सिग्नलवर एकापाठोपाठ उभ्या असलेल्या तीन 'आपली बस' एकमेकांवर धडकल्या. मागून आलेल्या बसने धडक दिल्याने तिन्ही बसेसच्या काचा फुटल्या. बसचा वेग कमी असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात 'पीएमआय' कंपनीच्या बस चालकाच्या चुकीमुळे झाला.