महागाव: तालुक्यातील शिरमाळ येथे १२ फूट लांबीचा आणि ४० किलो वजनाचा अजगर साप आढळला, सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान
महागाव तालुक्यातील शिरमाळ गावांमध्ये तब्बल १२ फूट लांबीचा व अंदाजे ४० किलो वजनाचा अजगर साप आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. या दुर्मिळ सापाला आज दि. १६ ऑक्टोबरच्या सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सर्पमित्राने ताब्यात घेऊन सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. एमएच-29 हेल्पिंग हॅन्ड नेचर क्लब, यवतमाळ यांच्या टीमने शिरमाळ शिवारात काशिनाथ आढाव यांच्या शेतात हा अजगर पकडला. या वेळी महागाव तालुका अध्यक्ष सचिन कोकने आणि अनिस शेख उपस्थित होते.