कराड: पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत एसटीला भरधाव कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कंटेनर चालक गंभीर जखमी
Karad, Satara | Oct 18, 2025 पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर गोटेगावच्या हद्दीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला भरधाव कंटेनरची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. बसमधील वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोटे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. मझाईर शहा वय २६ रा. जम्मू-कश्मीर राज्य असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.