फुलंब्री: जळगाव महामार्गावरील बोरगाव फाट्यावर जनावर चोरी प्रकरणी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
फुलंब्री तालुक्यातील बोरगाव फाट्यावर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील शेतकऱ्यांनी जनावरे चोरी गेल्याच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरपंच मंगेश साबळे यांच्यासह माजी सभापती किशोर बलांडे व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.