नागपूर शहर: हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून १४ वर्षीय मुलगा बेपत्ता; शोध न लागल्याने संतप्त नातेवाईकांचे 'चक्काजाम' आंदोलन
हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचा उत्साह असतानाच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या यात्रेतून १४ वर्षीय अथर्व नानोरे हा मुलगा बेपत्ता झाला असून, २४ तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. पोलिसांच्या तपासावर असंतोष व्यक्त करत आज अथर्वच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करत चक्काजाम आंदोलन केले.२ एप्रिल रोजी शहरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या थाटामाटात शोभायात्रा काढण्यात आली होती