तासगाव: डोंगरसोनी घाटमाथ्यावर टेंभू योजनेतून पाणी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
Tasgaon, Sangli | Sep 30, 2026 तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी घाटमाथ्यावर टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी प्रारंभ झालं. कैकाडी वस्तीपासून अंजनी तलावापर्यंत पाणी सोडले जाणार असून, पावसाअभावी तडाखा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष दिलासा मिळणार आहे. आमदार रोहित पाटील यांच्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाने त्वरित पाणी पुरवठा सुरू केला.