लातूर: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन
Latur, Latur | Sep 15, 2025 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.५० वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले जाईल व मानवंदना दिली जाईल.