नागपूर शहर: लग्नानंतर ४ महिन्यांतच नवविवाहितेची हुंड्यासाठी हत्या; पतीसह दोघांना अटक: संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 20 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार हुंड्याच्या हव्यासापोटी लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत १९ वर्षीय फाजिला या नवविवाहितेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी पती मोहम्मद जुबेर आणि दीर मोहम्मद इरफान या दोघांना अटक केली असून, सासऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे