नागपूर शहर: शांतीनगरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक : अतुल मोहनकर पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर यांनी 12 जूनला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर परिसरात घरफोडी करून दागिने आणि साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-३ ने गजाआड केले आहे. निमेश रितेश लिंगायत आणि एका अल्पवयीन साथीदाराने राकेश खिंची यांच्या घरातून ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांनी परिसरात आणखी एक चोरी केल्याची कबुली दिली आहे.