अलिबाग: आक्षी साखर प्रकल्पामुळे मच्छीमारांना दिलासा
Alibag, Raigad | Apr 10, 2026 अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथे राबविण्यात येत असलेला ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता आणि खाडीतील गाळ काढण्याचा प्रकल्प परिसरातील मच्छीमारांसाठी दिलासादायक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे खाडीमुखाशी साचणाऱ्या गाळाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन बोटींना सुरक्षित व सुलभ ये-जा करता येणार आहे. सध्या खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे मासेमारी करून परतणाऱ्या बोटींना थेट बंदरात पोहोचणे कठीण होते.