मीरा भाईंदर मधील पेणकर पाडा येथील देवभूमी येथे काल महानगरपालिकेचे अधिकारी तोडक कारवाई करण्यासाठी आले होते. ती तोडक कारवाई थांबवण्यात आली असल्याची माहिती मीरा-भाईंदर मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आज दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री 12च्या सुमारास एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी संदीप राणे यांनी संताप व्यक्त केला असून आपण कोणतेही गुन्हे घ्यायला तयार आहोत अस ते म्हणाले.