चंद्रपूर शहरातील रामनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत शहरातील द युथ शोथोकान कराटे क्लबच्या खेळाडूंनी आपला नेत्रदीपक खेळ सादर करीत ६ सुवर्ण, ५ रजत तर दोन कास्यपदक प्राप्त केले.सदर स्पर्धेत जिल्ह्यातील १५० खेळाडूंनी सहभाग घेतला.यश प्राप्त केल्याबद्दल सदर खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.