अंबड: मिसिंग ची नोंद असलेल्या राजेंद्र जगताप यांचा मृतदेह आढळला सोनक पिंपळगाव येथील शेततळ्यात
Ambad, Jalna | Jul 3, 2025 मिसिंगची नोंद असलेल्या राजेंद्र जगताप यांचा मृतदेह आढळला शेततळ्यात अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव शेत शिवारातील खळबळजनक घटना सोनक पिंपळगाव (ता.अंबड) शेतशिवारात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शेततळ्यातील पाण्यावर तरंगत असल्याचे आज बुधवारी (ता.2) दुपारी 3-4 वाजेच्या दरम्यान शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.दरम्यान सदर मृतदेह हा 2 दिवसांपूर्वीच अंबड पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद झालेल्या राजेंद्र जगताप यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.