नागपूर शहर: बेलतरोडी पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; आरोपी रंगेहाथ अटकेत
नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि वेगवान कारवाई करत एका महिलेची संभाव्य हत्या टळवली आहे. दरवाजा तोडून घरात प्रवेश करत पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले आणि जखमी महिलेला अवघ्या १५ मिनिटांत रुग्णालयात पोहोचवून तिचे प्राण वाचवले. २१ मे रोजी मध्यरात्री १२:०५ च्या सुमारास गोटाळपांजरी परिसरात नाईट पेट्रोलिंग सुरू असताना, एका व्यक्तीने पोलिसांनी माहिती दिली की त्याचा मुलगा पत्नीवर चाकूने हल्ला करत आहे. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.