रामटेक: वडंबा कट पॉइंट येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल चालक गंभीर जखमी
Ramtek, Nagpur | Mar 26, 2026 नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वडांबा कट पॉईंट येथे एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या एका सायकल चालकाला धडक दिली. या धडकेत सायकल चालक जमिनीवर निपचित पडून जखमी झाला. ही घटना गुरुवार दिनांक 26 मार्चला सायंकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान वडांबा टी पॉईंट येथे घडली. या दुर्घटनेत शिशुपाल उईके, वय 40 वर्षे रा. कामठी हा जखमी झाला.