सुधागड: अंबा नदीचे पाणी वाळूउपशामुळे प्रदूषित
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे शहरातील धुंदीविनायक नगर भागात नळांना चक्क जंतुयुक्त काळे कुठे आणि दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापांचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो भाविक आणि स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या अंबा नदीचे पात्र रसायनयुक्त सांडपाणी कचरा आणि वाळू उपशामुळे प्रदूषित झाले आहे.