महाड: पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या हवालदार जाळ्यात
Mahad, Raigad | Oct 10, 2025 पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि मदतीच्या मोबदल्यात तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी हवालदाराने पहिल्या हप्त्यापोटी ३ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला. ही कारवाई १० ऑक्टोबर २०२५ रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून, हवालदाराचे नाव विशाल वाघाटे असे आहे. तो पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे कार्यरत होता.