रावेर: मस्कावद खुर्द शिवारातील दसनुर रोडावर फवारणी पंपात औषध भरताना दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी,सावदा पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 22, 2025 रावेर तालुक्यात मस्कावद खुर्द हे गाव आहे.या गावातून दसनूर जाणाऱ्या रोडावर जीवन पाटील यांच्या शेताच्या समोर फवारणीच्या पंपात फवारणीचे औषध हेमंत उर्फ पिंटू सिताराम पाटील हे टाकत होते. त्यांना दुचाकी क्रमांक एम.पी.०४ क्यू. एफ.५३५२ वरील अज्ञात चालकाने धडक दिली यामध्ये ते जखमी झाले तेव्हा या अपघात प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.