"स्वस्थ नारी सशक्त अभियान" अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी साठी जिल्हा स्तरीय महिला नोडल अधिकारी पुरस्कार डॉ. मनीषा साकोडे, जिल्हा माता बाला संगोपन अधिकारी , जिल्हा परिषद भंडारा याना देण्यात आला
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार' आणि 'महाआरोग्य सन्मान सोहळा २०२६' मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भंडारा जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री ना. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.