खंडाळा: सातारा जिल्हाच्या सरहद्दीपासून काही अंतरावर महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; मोठे नुकसान
पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीपासून अवघ्या काही अंतरावर कापूरहोळ येथे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र सर्व वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील महामार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट असून पूर्णपणे रस्ता उकरला आहे. यादरम्यान मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे काही काळ या महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.