औंढा नागनाथ तालुक्यातील पूर येथे अवैध देशी दारू विक्रीवर कारवाईसाठी गेलेल्या औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस, ओंकारेश्वर रांजणेकर सह पोलिसांना दुरूनच पाहून अवैध देशी दारू भिंगरी विक्रेत्याने मुद्देमाल जागेवर सोडून पळ काढल्याची घटना घडली आहे पोलिसांनी देशी दारूचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादी पोलिस अंमलदार ओंकारेश्वर राजनेकर यांच्या फिर्यादीवरून एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात पंधरा नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री दहा वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला