नागपूर शहर: नागपुरात अवैध हुक्का पार्लरवर छापा; मालकासह ११ जणांवर कारवाई
10 जूनला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी येथील 'सेकंड फ्लोर कॅफे'मध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा युनिट-२ ने धाड टाकली. या कारवाईत कॅफे मालक सन्नी बोरकर आणि मॅनेजर साजू खान यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट्स, नळ्या आणि डीव्हीआरसह एकूण २०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी आणि जप्त साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.