जिल्ह्यात १५ पर्यंत अवयवदान जनजागृती : डॉ. सुधाकर मोरे (जिल्हा आरोग्य अधिकारी)
4.6k views | Nashik, Maharashtra | Aug 7, 2025 महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी येत्या ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबवावी. व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या अनुषंगाने रुग्णांना नवजीवन देण्यासाठी जिल्हा भरात अवयवदान चळवळ राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सांगितले.