नागपूर शहर: वाहन चोरणारा अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट 5 च्या जाळ्यात: विनायक गोल्हे, पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 16 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट ५ ने एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत १९ वर्षीय अट्टल चोरट्याला अटक केली आहे. आदर्श सुरेश यादव असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.