एरंडोल शहरात डाग बंगला झोपडपट्टी परिसरातील रहिवाशी राकेश राजू बारेला वय १६ याने स्मशानभूमीच्या भिंतीच्या अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.