सांगलीत विजयनगर मध्ये राहणाऱ्या पोलिसाच्या पत्नीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रज्ञा पटलोबा दहिफळे (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्यांचे पती पोलिस दलात मोटार परिवहन विभागात कार्यरत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दहिफळे कुटुंबीय मूळचे लातूर येथील आहे. पटलोबा दहिफळे हे काही वर्षांपूर्वी सांगली पोलिस दलात भरती झाले. मोटार परिवहन विभागात ते चालक म्हणून कार्यरत आहेत. दहिफळ