मोर्शी: डोंगर यावली येथे पत्नीच्या डोक्यावर लोखंडी वस्तू मारून केले जखमी, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक नऊ नोव्हेंबरला पोलीस सूत्रांकडूनप्राप्त झालेल्या माहितीनुसार,मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगर यावली येथे,पती-पत्नीच्या झालेल्या भांडणात पतीने लोखंडी वस्तू पत्नीच्या डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना दिनांक 8 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. याबाबतीत अनिता वासुदेव धुर्वे राहणार डोंगर यावली या महिलेने दिनांक आठ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी वासुदेव कोकसाधुर्वे वर गुन्हा दाखल करून तपासात घेतला