नागपूर शहर: लुटमार करणाऱ्या टोळीचा क्राइम ब्रांचकडून पर्दाफाश; तिघांना अटक : बाबुराव राऊत,पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 16 जून ला दुपारी 4:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार क्राइम ब्रांच युनिट-४ ने लुटमारीच्या घटनांत सहभागी असलेल्या तीन जणांच्या टोळीला अटक केली आहे. मोहम्मद सरफराज, अयान अली आणि शेख सोहेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे लॉकेट, मोबाईल, रोख रक्कम, चाकू आणि दुचाकी असा एकूण १,८१,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.