नागपूर शहर: अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: सर्व ८ पीडित महिला मुस्लिम समाजाच्या; अध्यक्ष प्यारे खान यांचा धक्कादायक खुलासा
अमरावती येथील महिला लैंगिक शोषण प्रकरणाने आता एक नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची दखल घेत आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या सर्व आठही पीडित महिला या मुस्लिम समाजाच्या असल्याची खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे.