अमरावती: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी यवतमाळ येथून केले अटक,शहर गुन्हे शाखेच्या पथकाचे कारवाई
१८ ऑक्टोबर रो नांदगाव पेठ येथील दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फारुख खान शमशेर खान उर्फ शाहरुख ब्लॅक वय 32 वर्ष राहणार अकबर नगर,अमरावती यास अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ येथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नांदगाव पेठ यांच्या ताब्यात दिले आहे. दारू पिऊन झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने सदरचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती आज १९ ऑक्टोबर रविवार रोजी पहाटे पाच वाजून 34 मिनिटांनी पोलिसांकडून मिळालेली आहे