धृवनगर गंगापूर शिवार नाशिक : येथील श्री साई सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदाताई गव्हाणे, मनीषा शिंदे, सई गव्हाणे, शिवानी सहाणे, अभिषेक मेतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गव्हाणे, ग्रंथपाल वैशाली गायकर, समाधान गायकर,