चोपडा: हिंगोणा येथे घरात स्वयंपाक करत असताना ३७ वर्षीय महिलेला सर्पदंश, यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
हिंगोणा या गावात नसीबा मेहरबान तडवी वय ३७ ही महिला आपल्या घरात स्वयंपाक करत होती स्वयंपाक करत असताना अचानक तिच्या डाव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.