नागपूर शहर: उपचारादरम्यान गर्भवती महिला आणि गर्भातील शिशूचा मृत्यू; पार्थिव घेऊन नातेवाईक पोहचले हॉस्पिटल समोर
म्हाळगी नगर चौक येथील सुखकर्ता रुग्णालयात उपचारादरम्यान ६ महिन्यांच्या गर्भवती महिला प्रियंका मनीष पोटदुखे आणि त्यांच्या गर्भाशयातील शिशूचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयर परिसरात जोरदार हंगामा आणि तणाव निर्माण केला.