नागपूर शहर: विधान परिषदेतील राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे की, ते पाहून वेश्येलाही लाज वाटेल : विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधान परिषदेच्या निवडणुकीवर कडाडून टीका केली आहे. सध्याच्या राजकारणाचा 'बाजार' झाला असून, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून पैसे गोळा केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.