नागपूर शहर: नागपुरात पैशांच्या वादातून महिलेने पेटवली १० लाखांची कार; हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 1 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार गोधणी परिसरात एका ५५ वर्षीय महिलेने जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाची महागडी 'बलेनो' कार पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुष्पाबाई आमले असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून मालकाचे सुमारे १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.