बोदवड: बोदवड बसस्थानकावर महिलेच्या पर्स मधून ४० हजाराचा मुद्देमाल लांबवला, बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Oct 18, 2025 बोदवड शहरात बस स्थानक आहे या बसस्थानकावर प्रवासासाठी जया नितीन देवकर वय ३० ही महिला आली होती ती जामनेर जात होती बस क्रमांक एम.एच.२० बी. एल.०९४५ याद्वारे त्या जामनेर जात होत्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्स मधून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण ४० हजाराचा मुद्देमाल चोरी केला. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.