वसई: बिलालपाड्याच्या सत्यमेव जयते चाळीत राहणाऱ्या दीपक मेहरा या तरुणाने. केली आत्महत्या
Vasai, Palghar | Apr 18, 2024 बिलालपाड्याच्या सत्यमेव जयते चाळीत राहणाऱ्या दीपक मेहरा (२८) या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. मंगळवारी त्यांनी कामावर न जाता दारूच्या नशेत घरी पत्नीसोबत भांडण करून शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याने राहते घरी येऊन छताच्या लोखंडी पाइपला ओढणी बांधून गळफास घेतला. पेल्हार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.