नागपूर शहर: जय भीम पार्क येथे अज्ञात आरोपीने घरफोडी करून दोन लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून
11 एप्रिल ला रात्री सात वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील जय भीम पार्क येथे राहणाऱ्या सत्यभामा गजभिये या आपल्या कामावर गेल्या असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आणि प्राप्त तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.