नागपूर शहर: विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव; आरोपीच्या शोधात पोलीस पथक मध्यप्रदेशात
सोनेगाव येथील एका विवाहितेवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अय्याज ताज मदारे आणि आमीन शेख या दोन आरोपींना अटक करून त्यांना **पाच दिवसांची पोलीस कोठडी** सुनावण्यात आली आहे. मुख्य संशयित मौलाना (रा. तामिया, छिंदवाडा) याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे.