निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट होत असून कडाक्याच्या थंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. या वाढत्या थंडीमुळे यावर्षीचा पहिला दुर्दैवी मृत्यू नोंदला गेला असून देवगाव (ता. निफाड) येथील २२ वर्षीय युवकाचा थंडीत काकडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.