वसई: विरारमध्ये राहणार्या एका तरुणान्यागळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
Vasai, Palghar | Apr 22, 2024 विरारमध्ये पुर्वेकडे राहणार्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रफित तयार केली होती. पत्नीकडून होणारा त्रास आणि पोलिसाने दिलेल्या धमकीमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले होते. यामुळे संतप्त नातेवाईकांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी मयत तरुणाच्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर आरोप असलेल्या पोलिसाची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.