कल्याण: कल्याणच्या गिर्यारोहकाची धाडसी कामगिरी, अडीच हजार फूट उंचीचा कठीण कडा केला सर, थरारक व्हिडिओ आला समोर
कल्याणच्या गिर्यारोहकाने धाडसी कामगिरी केली आहे. कल्याणचा गिर्यारोहक भूषण पवार याने नागफणीचा कठीण कडा सर केला आहे. जमिनीपासून तब्बल अडीच हजार फूट उंचीवर असलेला कठीण कडा सर केला असून धाडसी कामगिरी केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तसेच कडा सर करत असतानाचा थरारक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.