घनसावंगी: पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका : तहसीलदार रमेश पागोटे..
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका : तहसीलदार रमेश पागोटे.. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत खरीप हंगामाची चाहूल दिली असली, तरी केवळ सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असे आवाहन तहसीलदार रमेश पागोटे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. पुरेसा, समाधानकारक आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच खरीप पेरणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात काही भागांत पाऊस झाला असला तरी