रामटेक: रामटेक येथील राखी तलावात पडून 27 वर्षीय युवकाचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Mar 20, 2026 रामटेक शहराच्या बायपास मार्गावर असलेल्या राखी तलावात पडून एका 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 19 मार्चला सायं. सहा वाजताच्या दरम्यान समोर आली. रोशन बबनराव ढोके वय 27 वर्षे रा. सुभाष वार्ड रामटेक असे मृतकाचे नाव आहे. तो बुधवारपासून घरून बेपत्ता होता. दरम्यान १९ मार्चला सायंकाळी काही लोकांना तलावात मृतदेह तरंगताना आढळला. त्यांनी याची माहिती रामटेक पोलिसांना दिली. उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शुक्रवार दिनांक 20 मार्चला त्याची वैद्यकीय शव विच्छेदन करण्यात येणार आहे.