फुलंब्री: दरी फाटा परिसरात क्रुझर वाहनाची पादचारी महिलेला धडक, महिला गंभीर जखमी
फुलंब्री ते सिल्लोड महामार्गावरील दरी फाटा परिसरामध्ये एका क्रुझर गाडीने समोर उभे असणाऱ्या पादचारी महिलेला जोराची धडक दिल्याने सदरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदरील महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.